Saturday, June 18, 2022

माकडीण आणि पिल्लू... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

माकडीण आणि पिल्लू

राजकारणात कुणीही कुणाला,
सहज उल्लू बनवू शकतो.
डोक्यावरून पाणी चालले की,
माकडीणीचे पिल्लू बनवू शकतो.

ही काही काल्पनिक नाही,
अगदी खरीखुरी गोष्ट आहे !
डोळे उघडून पाहिले तर,
ही गोष्ट संदर्भासह स्पष्ट आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7963
दैनिक झुंजार नेता
18जून2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...