Monday, June 6, 2022

सारे काही विजयासाठी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

सारे काही विजयासाठी

कधी काढतात ट्रिप,
कधी कुठेतरी कोंडल्या जातात.
फुटाफूट टाळण्यासाठी,
मार्ग आडमार्ग धुंडल्या जातात.

ज्याची त्याची किंमत,
ज्याला त्याला द्यावी लागते.
लिंबू आणि टिंबूंची तर,
विशेष काळजी घ्यावी लागते.

फिल्डिंग टाइट लावूनही,
कुठेतरी माशी शिंकली जाते,
एवढे सगळे केल्यानंतरच,
लोकशाही जिंकली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7951
दैनिक झुंजार नेता
6जून2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...