आजची वात्रटिका
---------------------
गद्दारीचे नाते-गोते
जेंव्हा कधी कालचे निष्ठावंत,
आज अचानक गद्दार होतात.
तेव्हा निष्ठावंत आणि गद्दारांकडून,
एकमेकांचे जाहीर उद्धार होतात.
कुठल्याही निष्ठावंतांच्यां गद्दारीचे,
जसे नेहमीच खुद्दारीशी नाते असते!
तसे आजच्या निष्ठावंतांचेच,
उद्याच्या गद्दारीशी नाते असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6511
दैनिक पुण्यनगरी
25जून 2022
No comments:
Post a Comment