----------------------
वॉर्ड रचना
कुठलीही वॉर्ड रचना,
हा कळीचा मुद्दा असतो.
डोक्यात जसा असते सोय,
तसा विजय सुद्धा असतो.
विजयाचे पारडे,
वॉर्ड रचना जड करते.
वार्डचे पारडे फिरले की,
कुणी निवडणुकीपूर्वी हरते.
वर वर लक्की ड्रॉ वाटावी,
अशी वॉर्ड वॉर्डची रचना असते!
कुणासाठी आनंदाची,
कुणासाठी धोक्याची सूचना असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7947
दैनिक झुंजार नेता
2जून2022
No comments:
Post a Comment