आजची वात्रटिका
----------------------
किडे आणि गहू
जसे गव्हा बरोबर किडे,
तसे किड्याबरोबर गहूही,
आरामात रगडू शकतात.
जेंव्हा तुमचे हितसंबंध
सातत्याने बिघडू शकतात.
गहू रगडायचे की किडे ?
इथेच तुम्ही अडू शकतात !
हे असे तेंव्हाच घडते,
जेंव्हा तुमच्या डोक्यात
किडे पडू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7961
दैनिक झुंजार नेता
16जून2022
No comments:
Post a Comment