Saturday, June 4, 2022

लोकशाही आदर्श.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------
लोकशाही आदर्श
राज्यसभा आणि विधान परिषद,
जशी कुणासाठी संधी असते,
तशी ती कुणा कुणासाठी,
चालून आलेली चंदी असते.
जणू तुंबलेल्या घोड्यांसाठीच,
मुद्दाम बाजार भरवला जातो !
बिनविरोधचा तोडगा काढून,
आपला आदर्श मिरवला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7949
दैनिक झुंजार नेता
4जून2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...