Monday, June 27, 2022

सैनिकी बाणा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सैनिकी बाणा

यांचा त्यांना टोमणा आहे,
त्यांचा यांना टोमणा आहे,
सैनिका - सैनिकातच,
रोज नवा सामना आहे.

वाट्टेल तसले बाण,
सैनिकांच्या भात्यात आहेत.
सेनापतींसाठी सैनिक,
पुन्हा पुन्हा गोत्यात आहेत.

उडाले ते कावळे,
राहिले ते मावळे आहेत!
बाटग्यांच्या अंगावरही,
आजकाल सोवळे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7968
दैनिक झुंजार नेता
27जून2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...