आजची वात्रटिका
----------------------
शास्त्रार्थ सभा
हनुमाच्या जन्मस्थळाचा,
नवाच वाद उभा आहे.
जी वादा-वादीने गाजली,
ती शास्त्रार्थ सभा आहे.
जय बजरंग बली,
तोड दुष्मन की नली.
नेमकी अशीच अवस्था,
शास्त्रार्थ सभेची झाली.
जन्मस्थळाचा वाद कायम,
अंजनेरी की किष्किंधा आहे ?
साधूंकडून मान अपमानाचा
राडा आणि रेंदा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6491
दैनिक पुण्यनगरी
1जून 2022
No comments:
Post a Comment