आजची वात्रटिका
----------------------
अमंगळ भ्रम
हीही नको,तीही नको,
बदलून हवी वाटते.
एखादी साधी ओवीही,
कधी कधी शिवी वाटते.
सर सलामत तो,
पगड्या पन्नास मिळतील.
या ओवीतले भाव,
सांगा कुणास कळतील?
ओव्या शिव्या वाटतात,
शिव्या ओव्या वाटू शकतात !
जशी तुमची नजर,
तसे अनुभव भेटू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6501
दैनिक पुण्यनगरी
15जून 2022
No comments:
Post a Comment