आजची वात्रटिका
---------------------
देखते रहो...
सत्तेसाठी वाट्टेल ते,
जेव्हा सगळेच अति होते.
तेंव्हा लोकांच्या मतदानाची,
अक्षरशः माती होते.
ज्याला जसे पाहिजे,
त्याला हवे तसे होते.
लोकमताचा अनादर होवून,
लोकमताचे हसे होते.
कुणाचे स्वप्न पूर्ण होते,
कधी माशी शिंकली जाते!
कधी हारते लोकशाही,
कधी लोकशाही जिंकली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7969
दैनिक झुंजार नेता
25जून2022
No comments:
Post a Comment