आजची वात्रटिका
----------------------
खोदकाम
पूर्वी बांधकाम करायचे,
आता खोदकाम करू लागले.
वर्तमान आणि इतिहासालाही,
आता बदनाम करू लागले.
दूध का दूध,पानी का पानी,
वर सामंजस्याची साय आहे !
सगळेच खोदले तर कळेल,
कुणाच्या बुडाखाली काय आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7950
दैनिक झुंजार नेता
5जून2022
No comments:
Post a Comment