Wednesday, September 30, 2020

उलट्या बोंबा


 आजची वात्रटिका

------------------------

उलट्या बोंबा

मेलेल्याशी वैर, कधीच धरू नका. सुशांतला पुन्हा पुन्हा, बदनाम करू नका.

सुशांत चुकला, सुशांत चुकत होता! उलट्या बोंबा नको, एकटा सुशांतच; गांजा फुकत होता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7420 दैनिक झुंजार नेता 30सप्टेंबर2020

कोरोना चॅलेंज


 आजची वात्रटिका

------------------------

कोरोना चॅलेंज

आजचा दिवस बघितला,
उद्याचा दिवस बघून दाखवा.
कोरोना चॅलेंज देतोय,
तुम्ही फक्त जगून दाखवा.

हे कोरोनाग्रस्त वर्षच जणू,
आपली कसोटी बघण्याचे आहे !
इतर काही कमावण्यापेक्षा,
हे वर्ष फक्त जगण्याचे आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7419
दैनिक झुंजार नेता
29सप्टेंबर2020

पक्षीय एकता


 आजची वात्रटिका

------------------------

पक्षीय एकता

राजकीय पक्षा-पक्षामध्ये,
जाती-पातीचे गट आहेत.
आपापल्या जाती-पातीचे,
आपल्याभोवती तट आहेत.

गटा-तटाची ही तटबंदी,
गरज म्हणूनही मान्य आहे !
विविधतेत एकता शोधण्याची,
पक्षीय एकताही धन्य आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5930
दैनिक पुण्यनगरी
29सप्टेंबर2020
-----------------------------

नो ऑप्शन !

आजची वात्रटिका
------------------------

नो ऑप्शन ! कोरोनाच्या एका परीक्षेपुढे, बाकी परीक्षा फिक्या आहेत. भावना अनावर झाल्या तरी, कोरोनापुढे त्या मुक्या आहेत.

एटी-केटी ना ढकलपास, कोरोनाकडे ऑप्शन नाही ! कोरोनाच्या फोटोखाली लिहावी, अशी एकही कॅप्शन नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5931 दैनिक पुण्यनगरी 30सप्टेंबर2020 -----------------------------

 

Monday, September 28, 2020

सत्ता-सत्य


 आजची वात्रटिका

------------------------
सत्ता-सत्य त्याच्याच हाती हुकुमाचा पत्ता, ज्याच्या हाती सत्ता आहे. हे सत्य काल होते, उद्या असेल आणि आत्ता आहे.

सत्तेचे सत्य तर, अगदी त्रिकालाबाधित आहे ! वास्तव बदलण्याची ताकद, केवळ राजगादीत आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7417 दैनिक झुंजार नेता 27सप्टेंबर2020

सुत आणि स्वर्ग


 आजची वात्रटिका

---------------------

सुत आणि स्वर्ग

याचा धागादोरा लागेना, कुणाचे कुणाशी सुत आहे? राज्यातील सत्ताबदलाच्या, अफवांना प्रचंड ऊत आहे.

सुतावरून स्वर्ग गाठणे, हे तर धोक्याचे काम आहे ! सत्तांतर जसे आकड्यांचे, तसे ते मोक्याचे काम आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7418 दैनिक झुंजार नेता 28सप्टेंबर2020

राजकीय वावड्या


आजची वात्रटिका

--------------------

 राजकीय वावड्या

राजकारणात असेही होऊ शकते,
राजजारणात तसेही होवू शकते.
राजकीय चाली चुकल्या तर,
राजकारणात हसेही होऊ शकते.

कुठल्याही राजकीय शक्यतांना,
आता राजकारणात वावडे नाही !
राजकीय वावडयांनाही महत्त्व यावे,
याचे आश्चर्यही हवे तेवढे नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5928
दैनिक पुण्यनगरी
27सप्टेंबर2020

अन्नत्याग आणि उपवास


 आजची वात्रटिका

---------------------

अन्नत्याग आणि उपवास

उपवास म्हणजे उपवास तो कसा अन्नत्याग होईल? अन्नत्यागाला उपवास म्हटल्यास, त्याचा भाविक भक्तांना राग येईल.

अन्नत्याग म्हणजे उपोषण, उपवासाला धार्मिक आधार आहे ! त्यांना कसला उपवास? त्यांना कसला अन्नत्याग? ज्यांची भूक नेहमीच उधार आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5929 दैनिक पुण्यनगरी 28सप्टेंबर2020

Saturday, September 26, 2020

धक्कादायक


 आजची वात्रटिका

---------------------

धक्कादायक

राजकारणाला कोरोना, अडवू शकला नाही. मतभेदांना कोरोना, दडवू शकला नाही.

कोरोनावर राजकारणाचा ठसठशीत शिक्का आहे ! कोरोनाच्या आयुष्यात, एवढाच एक धक्का आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7416 दैनिक झुंजार नेता 26सप्टेंबर2020

धुम्रवलय


 आजची वात्रटिका

---------------------

धुम्रवलय

आरोप प्रत्यारोपाला, एकच ऊत आहे. बॉलिवूडच्या मागे, सुशांतचे भूत आहे.

ड्रग्जच्या संशयाचे, धुराचे लोट आहेत ! आपल्याच दाताखाली, आपलेच ओठ आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5927 दैनिक पुण्यनगरी 26सप्टेंबर2020

Friday, September 25, 2020

बॉलिवूड

आजची वात्रटिका
---------------------

बॉलिवूड 

बॉलिवूड म्हणजे,
फिल्नी मस्ती आहे.
बॉलिवूड म्हणजे,
कॅमेऱ्याशी दोस्ती आहे.

बॉलिवूड म्हणजे,
भोवती ग्लॅमर आहे.
बॉलिवूड म्हणजे गॉसिप,
त्यात रोज भर आहे.

बॉलिवूडच्या मोहात,
भविष्याची आशा आहे !
दुर्दैवाने बॉलिवूड म्हणजे,
नशा एके नशा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7415
दैनिक झुंजार नेता
25सप्टेंबर2020
--------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)lसदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) माझ्या  *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...सबस्क्राईब करा...!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
वाचत रहा...बघत रहा
आणि ऐकत रहा....
नवा दिवस.....नव्या वात्रटिका !!
-सूर्यकांत डोळसे
25सप्टेंबर2020

नो चॅलेंज !


 आजची वात्रटिका

--------------------

नो  चॅलेंज !

कळत नाही नेटीझन्स मंडळी, कशी एवढी खुळी आहे ? कसल्या कसल्या चॅलेंजला, नेटीझन्स मंडळी बळी आहे.

अमुक दाखवा,तमुक दाखवा, सोशल मीडियाला भुलू नका ! नागव्यांच्या नादी लागून, चव्हाट्यावर इज्जत तोलू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5926 दैनिक पुण्यनगरी 25सप्टेंबर2020

Thursday, September 24, 2020

आज की सोच


 आजची वात्रटिका

---------------------
आज की सोच
कोणताही उपाय
अजून तरी ठोस नाही.
जगभरात कोरोनावर,
अजून तरी लस नाही.
लस लस करू नका,
ना वसवस करू नका.
नसती उठाठेव करून,
हकनाक मरू नका.
सावध रहा,सुरक्षित रहा,
एवढाच एक मार्ग आहे !
कशासाठी उत्सुकता?
कसा नरक? कसा स्वर्ग आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7414
दैनिक झुंजार नेता
24सप्टेंबर2020

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...