Thursday, September 17, 2020

कोरोनाचे नखरे



 आजची वात्रटिका
-----------------------
कोरोनाचे नखरे
जिवघेण्या भोचक कोरोनाचे,
रोज नवे नवे नखरे आहेत.
सावध आणि बेसावधही,
कोरोनाच्या बळीचे बकरे आहेत.
भेटीगाठीवर माणूस,
भीतीपोटी नियंत्रण ठेवू शकतो.
पूर्वी कोरोना कवेतून यायचा,
आता तो हवेतून येऊ शकतो.
सॅनिटायझर लावता लावता,
कुणी अल्कोहोलिक होऊ शकतो !
कदाचित भविष्यात कोरोना,
धूम्रपान करायला लावू शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-5918
दैनिक पुण्यनगरी
17सप्टेंबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...