Wednesday, September 23, 2020

युद्ध प्रसंग


 आजची वात्रटिका

---------------------
युद्ध प्रसंग
नाक झाकता झाकता,
नाकी नऊ येऊ लागले.
आपल्या मुस्कटदाबीने,
दात ओठ खाऊ लागले.
कोरोना कोरोना,
सर्वत्र एकच ओरडा आहे.
अत्याचार सहन करून,
घसासुद्धा कोरडा आहे.
जिच्यावर सगळी मदार
ती प्रतिकारशक्ती आहे !
तोच खरा योद्धा,
ज्याची स्वतःवर भक्ती आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7413
दैनिक झुंजार नेता
23सप्टेंबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...