Saturday, September 12, 2020

कावळ्यांची काळजी

आजची वात्रटिका
-------------------------
कावळ्यांची काळजी
सोशल डिस्टनसिंग पाळा रे,
उगीच होऊ नका बावळे !
पितरांच्या पत्रावळ्या बघत,
कावळ्यांना म्हणाले कावळे.
काव काव करू नका,
ना च्याव च्याव करू नका.
दहाव्यांचेही तीन-तेरा वाजले,
किमान हे तरी विसरू नका.
कोरोनामुळे सगळीकडे,
एकच खळबळ माजली आहे !
नाहीतरी सोशल डिस्टनसिंग,
आपल्या पाचवीला पूजली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5913
दैनिक पुण्यनगरी
12सप्टेंबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...