Thursday, September 17, 2020

कांद्याची कथा


 आजची वात्रटिका

-----------------------
कांद्याची कथा
खुर्चीवर कुणीही असो,
कांदा आणतो डोळ्यात पाणी.
सोयी-सोयीने गायली जातात,
आयात-निर्यातीची गाणी.
कथा अकलेच्या कांद्याची,
प्रत्यक्षात अनुभवली जाते !
नासक्या-फुसक्या धोरणाने
शेतकऱ्यांना शेंडी लावली जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7406
दैनिक झुंजार नेता
16सप्टेंबर2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...