Wednesday, September 9, 2020

प्राणवायू

आजची वात्रटिका

---------------------

प्राणवायू

सारे जगच आता,
कोरोनामुळे सैरभैर झाले.
लोकांमधल्या वैराचे,
कोरोनामुळे हाडवैर झाले.

दुःखाबरोबर सुखालाही
आता वाटेकरी राहिले नाहीत.
खाट मोकळी करून देतील,
असे खाटेकरी राहिले नाहीत.

कोरोनाचा खेळच,
कल्पनेपेक्षा न्यारा आहे.
प्रत्येकाला आपला जीव,
आता जास्तच प्यारा आहे.

काळ बनून फडफडणारे,
कोरोनाचे कॅलेंडर आहे !
आत्मिक प्रतिकारशक्तीच
ऑक्सिजनचे सिलेंडर आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7400
दैनिक झुंजार नेता
9सप्टेंबर2020

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...