आजची वात्रटिका
------------------------
कोरोना चॅलेंज
आजचा दिवस बघितला,
उद्याचा दिवस बघून दाखवा.
कोरोना चॅलेंज देतोय,
तुम्ही फक्त जगून दाखवा.
हे कोरोनाग्रस्त वर्षच जणू,
आपली कसोटी बघण्याचे आहे !
इतर काही कमावण्यापेक्षा,
हे वर्ष फक्त जगण्याचे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7419
दैनिक झुंजार नेता
29सप्टेंबर2020
No comments:
Post a Comment