Friday, September 11, 2020

संभाजी बिडी



आजची वात्रटिका

----------------------

संभाजी बिडी


मराठी अस्मितेच्या नावाने 

पोकळ तुतार्‍या फुकल्या जातात.

अजूनही छत्रपती संभाजी 

राजांच्या नावाने

महाराष्ट्रात बिड्या विकल्या जातात.


त्यांना दोष कसा द्यावा ?

ते तर बिड्याविके आहेत !

ज्यांनी निषेध करायचा,

तेच खरे बिड्याफुके आहेत !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

 मोबाईल-9923847269

--------------------------------

चिमटा-1726

दैनिक पुण्यनगरी

22डिसेंबर2008

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...