Friday, September 11, 2020

अस्मितेची चादर


 आजची वात्रटिका

---------------------------
अस्मितेची चादर
मुद्द्याचे बोला म्हटले की,
त्यांना नेमकी गालफुगी होते.
महत्त्वाच्या गोष्टी टाळण्यासाठी,
नेमकी अस्मिता जागी होते.
अस्मिता कुणाचीही असो,
तिचा नेहमीच आदर आहे !
फक्त झाकाझाकी करण्यासाठी,
अस्मिता नावाची चादर आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
चिमटा-5912
दैनिक पुण्यनगरी
11सप्टेंबर2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...