Friday, September 11, 2020

बिड्या-काड्या आणि खोड्या


 --------------------

आजची वात्रटिका
----------------------

बिड्या-काड्या आणि खोड्या

कुणाच्या नावाने बिड्या आहेत,
कुणाच्या नावाने काड्या आहेत.
थोड्या थोड्या म्हणता म्हणता,
त्यांच्या खोड्यामागून खोड्या आहेत.

बिड्या-काड्या आणि खोड्यावाले,
यांचे पूर्वीपासूनच लागेबांधे आहेत!
बिड्या-काड्या आणि खोड्या,
सगळे सहन केल्या जातात,
याचेच तर खरे वांधे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7402
दैनिक झुंजार नेता
11सप्टेंबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...