Sunday, September 13, 2020

उलटा न्याय

 

आजची वात्रटिका
-------------------------
उलटा न्याय
आजकाल 'पॉझिटिव्ह'म्हटले की,
लोक 'निगेटीव्ह'विचार करू लागले.
फक्त 'ऑक्सिजन' म्हटले की,
लोक श्वास रोखून धरू लागले.
सामाजिक अंतर कमी होण्याऐवजी,
कोरोनामुळे ते जास्तच वाढले आहे.
एका कोरोनाने सगळे काही,
उलट-सुलट करून सोडले आहे.
संकटात धावून येणारांचाही
नाविलाजाने काढता पाय आहे !
जो माणुसकीचे मुडदे पाडतोय,
तो कोरोनाचा उलटा न्याय आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5914
दैनिक पुण्यनगरी
13सप्टेंबर2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...