Monday, September 14, 2020

राजकीय गृहीत

आजची वात्रटिका
-----------------------
राजकीय गृहीत
त्यांची टाळीवर टाळी आहे,
आमची जीभ तर काळी आहे.
राजकारण्यांनी गृहीत धरलेय,
जनता येड्यावरोबर खुळी आहे.
खुळेपणावर आणि बुळेपणावर,
कुणीही येतो,राज्य करून जातो !
स्वतःचे पाय पुजून घेऊन,
जो तो स्वतःला पूज्य करून घेतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7404
दैनिक झुंजार नेता
14सप्टेंबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...