आजची वात्रटिका
---------------------
अन्नत्याग आणि उपवास
उपवास म्हणजे उपवास
तो कसा अन्नत्याग होईल?
अन्नत्यागाला उपवास म्हटल्यास,
त्याचा भाविक भक्तांना राग येईल.
अन्नत्याग म्हणजे उपोषण,
उपवासाला धार्मिक आधार आहे !
त्यांना कसला उपवास?
त्यांना कसला अन्नत्याग?
ज्यांची भूक नेहमीच उधार आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5929
दैनिक पुण्यनगरी
28सप्टेंबर2020
No comments:
Post a Comment