Tuesday, September 15, 2020

मान आणि मर्यादा


 आजची वात्रटिका

-----------------------

मान आणि मर्यादा

तुमच्या-माझ्या आणि महाराष्ट्राच्या, कपाळावर आज आठ्या आहेत. खरच महाराष्ट्रापेक्षा मोठ्या, बॉलीवूडच्या नट आणि नट्या आहेत?

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला, स्त्रीदाक्षिण्य कुणी शिकवू नये. कचकड्या बाहुल्यांनी आपले बेंड, वातावरण तापवून पिकवू नये.

राजकारण तर रंगणारच पण; हवेत आणि नथीतून तीर मारू नका! महाराष्ट्राची मान खाली जाईल, असे चुकूनही काही करू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5916 दैनिक पुण्यनगरी 15सप्टेंबर2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...