Thursday, September 10, 2020

आपली चॉईस


 आजची वात्रटिका

---------------------------
आपली चॉईस
बापाच्या पाठीशी पोरं,
पोरांच्या पाठीशी बाप आहे.
आपले राजकारणच,
निव्वळ आडमाप आहे.
तिला हमखास टोणगा होतो,
जी भरवश्याची म्हैस आहे !
घरणेशाहीची बोंब नको,
ती तर आपलीच चॉईस आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7401
दैनिक झुंजार नेता
10सप्टेंबर2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...