Saturday, September 19, 2020

सैनिकी बाणा


 आजची वात्रटिका

------------------------
सैनिकी बाणा
या सेनेतून, त्या सेनेत,
सैनिक खपला जातो.
सेना बदलली तरी,
सैनिकी बाणा जपला जातो.
वेगळी सेना, वेगळा सेनापती;
सैनिक मात्र तेच असतात !
त्यांना त्याचे काहीच नसते,
आपल्यापुढे पेच असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7409
दैनिक झुंजार नेता
19सप्टेंबर2020

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...