Thursday, September 10, 2020

बॅट बॉलची चिंता

आजची वात्रटिका

---------------------------
बॅट बॉलची चिंता
आयपीएलच्या मोसमात,
तुझे माझे कसे व्हायचे?
तुझा संपर्क टाळता टाळता,
माझेच नसता हसे व्हायचे.
सोशल डिस्टनसिंग पाळले तर,
प्रेक्षकांना बोअर होईल.
आपण भेटल्या-खेटल्या शिवाय,
सांग कसा स्कोअर होईल?
खेळापेक्षा धंदा मोठा होऊन,
बदनाम क्रिकेट व्हायला नको !
त्यांच्या खेळा-खेळात,
तुझी-माझी विकेट जायला नको !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5911
दैनिक पुण्यनगरी
10सप्टेंबर2020
------------------------------

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...