Tuesday, September 15, 2020

टेस्टींग इंडीया


 आजची वात्रटिका

-----------------------
टेस्टींग इंडीया
कोरोनाच्या लहरीपणामुळे,
आज प्रत्येकजण कोड्यात आहे.
कालपर्यंत शहरात रमणारा कोरोना,
आता तर खेड्या-पाड्यात आहे .
लहरी आणि शहरी कोरोनाचे
आता जणू ऑल दि बेस्ट आहे !
केवळ अँटीजनच नाहीतर,
आयुष्याचीच बिघडलेली टेस्ट आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7405
दैनिक झुंजार नेता
15सप्टेंबर2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...