Showing posts with label वात्रटिका. Show all posts
Showing posts with label वात्रटिका. Show all posts

Saturday, January 17, 2026

बंडखोरी आणि दृष्टिकोन...साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका


साप्ताहिक
वात्रटिका 
--------------------------------

बंडखोरी आणि दृष्टिकोन

आपल्या बंडखोरांची हकालपट्टी, 
दुसऱ्यांच्या बंडखोरांचे स्वागत आहे.
लोकशाही आपली टिंगल टवाळी, 
अगदी उघड्या डोळ्यांनी बघत आहे.

ज्याच्या त्याच्या बंडखोरीचा, 
वेगवेगळा असा राजकीय रंग आहे.
इतरांच्या बंडखोरीचे कौतुक,
आपल्याकडून मात्र शिस्तभंग आहे.

राजकीय बंडखोरीकडे बघण्याचे,
प्रत्येकाचे दुटप्पी असे धोरण आहे !
सगळ्याच पक्षांच्या छावणीला,
हल्ली पक्षीय बंडखोरांचे तोरण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 69
वर्ष- दुसरे 
17 जानेवारी 2026

Monday, December 26, 2022

सूडाग्नी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
सूडाग्नी
सूडाग्नीने सूडाग्नी,
धडाधड पेटायला लागले.
सगळेच एकापेक्षा एक,
सूडासूर वाटायला लागले.
शब्दा शब्दात आग आहे,
डोळ्या डोळ्यात आग आहे!
आपल्या राजकीय इतिहासाचा,
वर्तमानाला प्रचंड राग आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8131
दैनिक झुंजार नेता
26डिसेंबर2022

 

Friday, June 3, 2022

नामांतर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

नामांतर

एकाचे बघून दुसऱ्याला,
नामांतराची नशा चढते आहे.
नामांतराच्या मागण्यांमध्ये,
रोज नव्याने भर पडते आहे.

नामांतराच्या मागण्या बघून,
राष्ट्रपुरुषांची किव आहे.
नामांतराचा मुद्दा जसा ताजा,
तसाच तो चिरंजीव आहे.

मागण्या झाल्या,मागण्या होतील,
मागण्यांना काही मरण नाही !
जर भूमिका सर्वमान्य असेल तर,
राजकारणाचेही कारण नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6494
दैनिक पुण्यनगरी
3जून 2022

 

Saturday, August 21, 2021

कुचाळकी..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

कुचाळकी

हाही वाचाळ आहे,
तोही वाचाळ आहे.
परिणाम काय तर,
सगळेच गचाळ आहे .

वाचाळ आणि गचाळ,
यांचा जेंव्हा मेळ होतो !
मर्यादांचे उल्लंघन होऊन,
कुचाळकीचा खेळ होतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7681
दैनिक झुंजार नेता
21ऑगस्ट 2021

 

Wednesday, August 18, 2021

भक्ती दर्शन...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भक्ती दर्शन

कुणी असतात मवाळ,
कुणी अगदी सक्त असतात.
कुणी आंधळे,कुणी डोळस,
भक्त मात्र भक्त असतात.

कुणाची भक्ती निर्गुण निराकार,
कुणाची सगुण-साकार आहे.
पुतळे,मंदीरे आणि मुर्त्या,
हा त्यातलाच तर प्रकार आहे.

आंधळया आणि कट्टर भक्तांना,
भक्ती दर्शनाचा मोठा चेव येतो!
भक्तांच्या देवभोळेपणामुळे,
सामान्य माणसाचाही देव होतो !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7678
दैनिक झुंजार नेता
18ऑगस्ट 2021

 

Friday, July 2, 2021

नो ऑप्शन!


आजची वात्रटिका
---------------------

नो ऑप्शन!

कुणी उगीचच भुंकू लागले,
कुणी सूर्यावर थुंकू लागले.
कुणी नाकात काड्या घालून
जोरजोरात सत्य शिंकू लागले.

भुंकावे लागते,थुंकावे लागते;
सत्यासाठी शिंकावे लागते!
रडीचे डाव खेळून खेळून,
वाट्टेल तसे जिंकावे लागते !!

-सूर्यकांत डोळसे पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6193
दैनिक पुण्यनगरी

2जुलै2021 

Saturday, February 13, 2021

प्रेमाचा गुलकंद

आजची वात्रटिका
----------------------
प्रेमाचा गुलकंद
व्हॅलेंटाईनच्या उत्सवासाठी,
त्यांनी गुलाब गोळा केले.
बिचाऱ्यांचे स्वप्न मात्र,
त्यांच्याकडून चोळामोळा झाले.
ज्यांच्या गुलाबांचे चोळामोळा,
त्यांच्या देखत असतात !
त्याच गुलाबाचा गुलकंद,
ते वर्षभर चाखत असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7523
दैनिक झुंजार नेता
13फेब्रुवारी2021

 

Friday, September 25, 2020

बॉलिवूड

आजची वात्रटिका
---------------------

बॉलिवूड 

बॉलिवूड म्हणजे,
फिल्नी मस्ती आहे.
बॉलिवूड म्हणजे,
कॅमेऱ्याशी दोस्ती आहे.

बॉलिवूड म्हणजे,
भोवती ग्लॅमर आहे.
बॉलिवूड म्हणजे गॉसिप,
त्यात रोज भर आहे.

बॉलिवूडच्या मोहात,
भविष्याची आशा आहे !
दुर्दैवाने बॉलिवूड म्हणजे,
नशा एके नशा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7415
दैनिक झुंजार नेता
25सप्टेंबर2020
--------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)lसदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) माझ्या  *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...सबस्क्राईब करा...!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
वाचत रहा...बघत रहा
आणि ऐकत रहा....
नवा दिवस.....नव्या वात्रटिका !!
-सूर्यकांत डोळसे
25सप्टेंबर2020

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...