Sunday, October 22, 2023

रहस्य भेद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
रहस्य भेद
राजकारणात गुन्हेगार,
जस जसे वाढायला लागले.
तस तसे राजकरण्यांची इज्जत,
गुन्हेगार काढायला लागले.
दोघांचीही इकडे तिकडे,
सतत आवक जावक आहे.
राजकारणी आणि गुन्हेगार,
यांचे तर एकच देवक आहे.
दोघांचेही कुळ आणि मूळ,
कधीच कुणीसुद्धा शोधू नये !
जे सर्वांनाच माहिती आहे,
असे उघड रहस्यही भेदू नये !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
22ऑक्टोबर2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...