आजची वात्रटिका
-------------------------
कॉपीचे हायटेक दर्शन
वाढत्या बेरोजगारीचा ,
फक्त इशाराच काफी आहे.
कोतवालाच्या परीक्षेतसुद्धा,
आता हायटेक कॉपी आहे .
वाढत्या बेरोजगारीचा इशारा,
समजून घेतलेलाच बरा आहे.
उलटा चोर कोतवाल को डाटे,
अशीच काहीशी तऱ्हा आहे.
बेरोजगारी वाढविते स्पर्धा,
स्पर्धा कॉप्या वाढविते आहे !
लो प्रोफाइल परीक्षेतही,
कॉपी हायटेक दर्शन घडवितेआहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8378
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11ऑक्टोबर2023
Subscribe to:
Post Comments (Atom)
नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment