Monday, October 23, 2023

डबल ढोलकी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
डबल ढोलकी
कुणालाच काही कळेना?
ते अजून तरी कुठे सिद्ध आहे?
कोण कुणाच्या बाजूने,?
कोण कुणाच्या विरुद्ध आहे?
जसे अर्धे बाजूने आहेत,
तसे विरोधातही अर्धे आहेत.
कसला विरोध ?कसली बाजू?
सगळेच अर्धे मुर्धे आहेत.
तशी सगळ्यांचीच देहबोली,
अगदीच बोलकी आहे !
दोन्हीही बाजूंनी वाजणारी,
ही तर डबल ढोलकी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
23ऑक्टोबर2023

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...