Sunday, October 1, 2023

राजकीय सोय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय सोय

यांची इकडे कल्टी आहे,
त्यांची तिकडे कल्टी आहे.
कालच्या आपल्या भूमिकांची,
एकदमच टांगा पलटी आहे.

काल जे सरळ वाटायचे,
तेच आज वाकडे आहेत.
कालच्या आपल्या भूमिकांशी,
त्यांचे छत्तीसचे आकडे आहेत.

काल ज्याला नको म्हणत होते,
त्यासाठीच आज त्यांचे होय आहे !
कसल्या भूमिका कसले काय?
सर्वांचीच ही राजकीय सोय आहे

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8368
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1ऑक्टोबर2023
 

No comments:

daily vatratika...3april2025