Monday, October 9, 2023

काल्पनिक आनंद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

काल्पनिक आनंद

जेव्हा गट तट वाढू लागतात,
जेव्हा पक्ष फटाफट फुटू लागतात.
तेव्हा अनेक भावी मुख्यमंत्री,
कल्पित आनंद लुटू लागतात.

कल्पना ही कल्पनाच असते,
याचेही सर्वांनाच ज्ञान आहे !
लोकांना अभिमान वाटायला हवा,
आपल्याकडे केवढी खाण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8376
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9ऑक्टोबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...