Monday, October 30, 2023

लक्ष विचलन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लक्ष विचलन

जुन्या मुद्द्याकडून नव्या मुद्द्याकडे,
लोक बरोबर वळवले जातात.
लोकांचे लक्ष विचलित करून,
लोक बरोबर खेळवले जातात.

एकदा नवे मुद्दे चर्चेत आले की,
लोक जुने मुद्दे विसरू लागतात.
नव्या मुद्द्यांच्या लाटेमध्ये,
जुन्या लाटा ओसरू लागतात.

जुन्या मुद्द्यांना नव्या मुद्द्यांनी,
राजकीय शह दिले जातात !
नवे मुद्दे नवे असले तरी,
सोईप्रमाणे ते जुने केले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8391
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
30ऑक्टोबर2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...