Tuesday, October 3, 2023

कावळ्यांची टंगळ मंगळ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कावळ्यांची टंगळ मंगळ

एकाच कुटुंबात होणारे पित्र,
अनेक ठिकाणी होऊ लागले.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे,
पितृ अनेक ठिकाणी जेवू लागले.

हे सगळे विभक्त कुटुंब चित्र,
कावळ्यांना पहावे लागत आहे.
एकाच पित्राच्या पिंडाला,
अनेक ठिकाणी शिवावे लागत आहे.

पित्रांबरोबर कावळ्यांचीही
हल्ली पितृपाठात चंगळ आहे !
त्यामुळेच पिंडाला शिवण्याची,
कावळ्यांची टंगळ मंगळ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8370
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3 ऑक्टोबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका8मे2024....वर्ष- तिसरे..अंक -336वा

दैनिक वात्रटिका 8मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -336वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1XewNOM-fFB8BoGskcn2d3Hm3EQ...