Tuesday, October 10, 2023

सामाजिक अवस्था...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सामाजिक अवस्था

कुणी मेले काय?कुणी जगले काय?
लोकांनाही कशाचे काही वाटत नाही.
कितीही टाहो ऐकले तरी,
कुणाला हुंदकाही सुद्धा फुटत नाही.

जणू काय आजकाल लोकांची,
सगळी संवेदनशीलता मेली आहे !
रोजचेच मढे त्याला कोण रडे,
यामुळेच ही अवस्था झाली आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8377
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10ऑक्टोबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...