Wednesday, October 18, 2023

भूकंपाच्या पूर्वसूचना....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भूकंपाच्या पूर्वसूचना

कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे,
जशा याचनावरती याचना आहेत.
तशा महाराष्ट्रातही भूकंपाच्या,
पूर्वसूचनावरती पूर्व सूचना आहेत.

राजकीय भूकंपाच्या पूर्वसूचनेने,
शंका आणि कुशंकांनाही ऊत आहेत.
भूकंपाच्या पूर्वसूचना देणारे,
सगळे पेरलेले राजकीय दूत आहेत.

ज्याच्या त्याच्या डोक्यामध्ये,
चूकचुकणारी शंकेची पाल असेल !
इतरांना भूकंपाचे धक्के असतील,
त्यांच्यासाठी राजकीय चाल असेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8385
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18ऑक्टोबर2023
 

No comments:

daily vatratika...3april2025