Tuesday, October 31, 2023

विकृत हास्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

विकृत हास्य

जस जसे कळू लागते,
तस तसे जास्तच छळू लागते.
जेंव्हा कधी ओल्यासोबत,
थेट वाळलेलेही जळू लागते.

ओले काय?वाळले काय?
सगळ्यांचीच धग बसू लागते !
सत्याकडे बघून असत्य,
मग विकृतपणे हसू लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
31ऑक्टोबर2023
 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...