Saturday, October 21, 2023

ड्रग्जची नशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

ड्रग्जची नशा

राजकारणी ते राजकारणीच,
त्यांना राजकारणाचा धोशा आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला,
आता तर थेट ड्रग्जची नशा आहे.

पळवा-पळवी;खेळवा-खेळवी,
हे सगळे तर अगदी नित्य आहे.
ड्रग्जची नशा चढली असली तर,
त्यांचे प्रचंड शब्द लालित्य आहे.

राजकारण आणि ड्रग्ज म्हणजे,
चक्क नशेचे कॉकटेल आहे !
जिथे गुन्हेगारांना डांबायचे,
तिथूनच ड्रग्ज रॅकेटचा स्मेल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
21ऑक्टोबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...