Sunday, October 15, 2023

रंगवेडी तऱ्हा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

रंगवेडी तऱ्हा

आजचा अमुक रंग आहे,
उद्याचा तमुक रंग आहे.
सगळ्याच रंगबावऱ्यांना,
रोज नव्या रंगाची झिंग आहे.

एक एक रंग वेडी,
एवढी काही रंग वेडी आहे.
सकाळ,दुपार,संध्याकाळ,
वेगळ्या छटांची साडी आहे.

एकच रंग पण छटा अनेक,
अशी त्यांची रंगवेडी तऱ्हा आहे !
कुणाच्या अकलेचा पंचनामा,
आपण न केलेलाच बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8382
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15ऑक्टोबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...