Tuesday, October 24, 2023

संभ्रम ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

संभ्रम

जसे खऱ्याचे खोटे होते,
तसे खोट्याचेही खरे होते.
एकदा राजकारण आले की,
असेच काहीसे सारे होते.

कर्ते करविते नामानिराळे,
इतरांच्या डोक्यांचा भुगा होतो.
काय खरे ? काय खोटे?
डोक्यातला किडा जागा होतो.

एकदा किडे जागे झाले की,
ते वाट्टेल तसे उडू लागतात !
कंड्या आणि अफावांसोबत,
वावड्यासुद्धा उडू लागतात !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8387
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24ऑक्टोबर2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...