Friday, October 27, 2023

राजकीय निवृत्ती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय निवृत्ती

जस जशा निवडणुका,
जवळ जवळ यायला लागल्या.
तस तशा राजकीय निवृत्तीच्या,
घोषणा व्हायला लागल्या.

पक्षा सोबत लोकांनाही,
सगळे गृहीत धरीत आहेत.
पुन्हा पुन्हा हलवून.
आपला खुट्टा घट्ट करीत आहेत.

जेवढे ज्याचे उपद्रव मूल्य,
तेवढी त्याची मनधरणी आहे !
राजकीय निवृत्तीच्या घोषणा,
ही निवडणुकीची करणी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8385
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
27ऑक्टोबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...