Wednesday, October 4, 2023

नाराजी नाट्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नाराजी नाट्य

नाराजी ही नाराजीच असते,
कधीच तिचा साधा डंख बसत नाही.
कुठल्याही नाराजी नाट्याला,
त्यामुळेच शेवटचा अंक असतं नाही.

जिथे पडदा पडल्यासारखा वाटतो,
तिथेच पुन्हा नवा अंक सुरू होतो.
जसे अंक वाढत जातील तसे,
नाराजीचा नवा डंख सुरू होतो.

नाराजी कितीही लपविली तरी,
नाराजी कधीच लपली जात नाही !
आपण नाराज नसल्याची पुडी,
कुणाकडूनच खपली जात नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8371
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4ऑक्टोबर2023
 

No comments:

daily vatratika...3april2025