Monday, October 16, 2023

मुखवट्या मागचा दुखवटा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मुखवट्या मागचा दुखवटा

जमेल त्याचे हात धरू लागले,
जमेल त्याचे पाय धरू लागले.
आघाड्यांच्या नावाखाली,
सर्वच पक्ष बघा काय करू लागले?

सगळ्या भाराभर चिंध्या वाटतात,
त्यांच्यामध्ये एक ना धड आहे.
भूमिका बदलणे सोपे आहे,
पण भूमिका निभावणे अवघड आहे.

कुणी बदलत आहे चेहरा,
कुणाच्या चेहऱ्यावर मुखवटा आहे !
वर वर तडजोडीचा आनंद,
आत मध्ये मात्र दुखवटा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8383
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16ऑक्टोबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...