Thursday, October 12, 2023

सत्याची गळचेपी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सत्याची गळचेपी

सत्यापेक्षा असत्याचाच,
आज सगळीकडे डंका आहे.
असत्याचे होते कौतुक,
पण सत्यावरतीच शंका आहे.

असत्याकडे कानाडोळा,
सत्याकडे बोट उठले जाते.
सत्यावर शंका घेतल्याने,
असत्य मोकाट सुटले जाते.

सत्य हे सत्य असले तरी,
सत्य कुणाला पेलवत नाही!
कितीही इच्छा असली तरी,
सर्वांना सत्य बोलवत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8379
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
12ऑक्टोबर2023
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...