Tuesday, October 17, 2023

ऑलिंपिकमध्ये क्रिकेट..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

ऑलिंपिकमध्ये क्रिकेट

ऑलिंपिकच्या वर्तुळात,
आता क्रिकेटचीही एन्ट्री आहे.
ऑलिंपिकच्या कुंभमेळ्यात,
आता क्रिकेटचीही कॉमेंट्री आहे.

क्रिकेटच्या मार्केटला,
आता नवा बाजार खुला आहे.
क्रिकेटचे विश्व विस्तारले,
ऑलिंपिकने विश्वास दिला आहे.

कोट्यावधीत खेळणाऱ्यांना,
एका मेडलसाठी खेळावे लागेल !
टेस्टला आणि वनडे ला मात्र,
पार धुळीस मिळावे लागेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8384
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17ऑक्टोबर2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...