Thursday, October 19, 2023

नवरंग आहार.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
नवरंग आहार
नवरात्रीच्या नवरंगांना,
आता नवीनच बहार आहे.
ज्या दिवसाचा जो रंग,
त्याच रंगाचा आहार आहे.
नवरात्रीच्या नवा रंगांची,
ही तर नवीनच धूम आहे.
जसे ल्यावे;तसेच खावे,
ही तर नवीनच टूम आहे.
ही रंगीत संगीत मेजवानी?
की हा डाएट प्लॅन आहे ?
आपल्यासाठी हे हास्यास्पद,
पण भक्तांसाठी छान आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
19ऑक्टोबर2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...