Tuesday, October 3, 2023

मिस टाइमिंगचे राज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
मिस टाइमिंगचे राज
कालही आवाज मोठा होता,
आजही आवाज मोठा आहे.
डीजे विरुद्धचा गदारोळ,
तरी कसा म्हणावे खोटा आहे?
दहीहंडी गेली, गणपती गेला,
तोंडावरती नवरात्री आहे.
डीजे समर्थक विरोध करतील,
याची आम्हाला खात्री आहे.
डीजे बंद झालीच पाहिजेत,
ही मागणी रास्त असू शकते !
पण प्रांतवादाचे राजकारण,
डीजेच्या आवाजात दिसू शकते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
3ऑक्टोबर2023

 

No comments:

daily vatratika...3april2025